ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कृष्णा हॉस्पिटलमधून 4 कोरोनामुक्त युवकांना डिस्चार्ज
May 30, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

कृष्णा हॉस्पिटलमधून 4 कोरोनामुक्त युवकांना डिस्चार्ज

कराड, ता. 30 : कराड तालुक्यातील म्हासोली, नांदगाव आणि शामगाव येथील एकूण 4 कोरोनामुक्त युवकांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 81 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

 

म्हासोली येथील 32 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 22 वर्षीय व शामगाव येथील 22 वर्षीय युवक गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. 

 

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, अशोक भापकर यांच्या हस्ते कोरोनामुक्त झालेल्या युवकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

 

याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.