ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कृष्णा हॉस्पिटलमधून 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज.
June 17, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

 

कृष्णा हॉस्पिटलमधून 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

 

कराड, ता. 17 : येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 3 कोरोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 198 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

 

कराड तालुक्यातील विंग येथील 29 वर्षीय पुरुष, केसे येथील 32 वर्षीय महिला, जोरगाव - फलटण येथील 40 वर्षीय पुरुष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. 

 

या कोरोनामुक्त रूग्णांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. अभिजीत शेळके, डॉ. प्रवीण साळुंखे, डॉ. सम्राट मादनाईक, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.