ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कराड येथील बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू तर  मलकापूर ता. कराड येथील संशयित महिलेचा मृत्यू. 
June 29, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या

कराड येथील बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू तर 

मलकापूर ता. कराड येथील संशयित महिलेचा मृत्यू. 

सातारा दि. 29 (जि. मा. का): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शनिवार पेठ, कराड येथील 75 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

 तसेच काल रात्री मलकापूर ता. कराड येथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सारी आजारामुळे दाखल झालेल्या 85 वर्षीय महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोविड संशियत म्हणून या महिलेचा नमुना उपचारादरम्यान घेतला असून तो पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.