ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कराड तालुक्यातील महारुगडेवाडीत आढळला कोरोना बाधित रुग्ण. उंडाळे परिसरात खळबळ.
April 7, 2020 • चंद्रकांत चव्हाण

कराड/प्रतिनिधी:-

तांबवे ता.कराड नंतर उंडाळे परिसरातील महारूगडेवाडी येथे कोरोना बाधित दुसरा रुग्ण आज (दि.७) रोजी आढळुन आला असुन तालुका वैघकीय अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी ही माहिती दिल्या नंतर उंडाळे व परिसरात सक्त लाँक डाऊन लागु करण्यात आला.
  तांबवे नंतर कराड तालुक्यातील महारूगडेवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
  याघटने नंतर प्रशासनाकडुन खबरदारी घेत उंडाळे सह परिसरात कडक पावले उचलत उपाय योजना राबवल्या असुन   महारूगडेवाडी परिसर  सील करण्यात आला आहे.संबधित बाधित व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली असणाऱ्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाकडून गावात सर्वे सुरू असून घरोघरी जाऊन माहिती घेतली जात आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेताना त्रास होत असेल अशा व्यक्तींची  स्वतंत्र यादी तयार करण्यात येत आहे.  
संबंधित बाधित व्यक्ती मुंबईहून गावी आली असून सदरील व्यक्ती होम क्वारंटाईन नसल्याने तिचा काही अन्य जणांशी संपर्क आला असून आरोग्य विभाग याबाबत तातडीने पावले उचलत आहे.