ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कराडकरांना अखेर दिलासा ; दूध पुरवठा होणार सुरळीत
April 24, 2020 • चंद्रकांत चव्हाण

कराडकरांना अखेर दिलासा ; दूध पुरवठा होणार सुरळीत

कराड / प्रतिनिधी
कोरोना संक्रमणाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी कालपासून शंभर टक्के लॉक डाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असला तरी दूध पुरवठा बंद असल्याने मोठी गैरसोय होत होती. हे ध्यानात घेऊन कराड शहरात शुक्रवार 24 पासून दूध पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती इन्सिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

शुक्रवार 24 पासून सकाळी 6 ते 8 व संध्याकाळी 6 ते 8 या  दोन्ही वेळेत  सर्वांना घरपोच दूध उपलब्ध होणार आहे.
कोयना दूध संघ शहरातील प्रमुख वितरकाकडे दूध पोहच करेल.
 ते पुढे नागरिकापर्यंत पोहोच करतील..नागरिकांनी गर्दी न करता फोन द्वारे मागणी करावी.
 दुध पुरवठा अव्याहतपणे चालू राहणार आहे. इतर मुख्य वितरक याना घरपोच दूध वितरणासाठी परवानगी देत आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिघे यांनी केले आहे. दूध वितरणावर प्रशासनाचे लक्ष आहे नागरिकांनी दुधाच्या नावाखाली गर्दी केल्यास  संबंधित दूध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

गुरुवारी 23 पासून कराड मलकापूरसह परिसरातल्या तेरा गावात लॉक डाउनची कडक अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये होत आहे. यात रुग्णालय वगळता जीवनावश्यक सेवाही बंद होत्या. दूधपुरवठाही होत नसल्याने नागरिकांची विशेषतः लहान मुलांची गैरसोय होत होती. त्यामुळे दूध पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन अखेर घरपोच दूध सेवेला परवानगी देण्यात आली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 
नागरिकांनी दुधाच्या नावाखाली फिरत बसू नये. घरात बसून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.