ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन पश्चिम महाराष्ट्राच्यावतीने कोविड योध्दा गौरवपत्र प्रदान.
October 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण

अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन पश्चिम महाराष्ट्राच्यावतीने कोविड योध्दा गौरवपत्र प्रदान

 

तळमावले/वार्ताहर

तळमावले, काळगांव, कुंभारगांव, ढेबेवाडी विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार यांचा कोवीड योध्दा सन्मानपत्र देवून अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संगठन पश्चिम महाराष्ट्र यांच्यावतीने नुकताच तळमावले येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सोशल डिस्टन्स ठेवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी या संघटनेच्या पष्चिम महाराष्ट्र अध्यक्षा भारतीताई पवार, सचिव दिपालीताई खोत, जिल्हाध्यक्ष सुर्यकांत काळे, तालुकाध्यक्ष माणिक काळे, तळमावले ग्रामपंचायतीच्या सरपंच शोेभाताई भुलूगडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सुर्यकांत काळे, भारतीताई पवार, दिपालीताई खोत यांनी आपली मनोगते व्यक्त केली.