ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
"exit... नैसर्गिक अभिनयाची.....‼️
April 30, 2020 • चंद्रकांत चव्हाण • विशेष लेख

"exit... नैसर्गिक अभिनयाची.....!!

"इरफान खानला neuro endocrine tumor झाला नि इरफान खान नावाचा सच्चा कलाकार आणखीनच "सच्चा"वाटू लागला. किमोथेरपी सारख्या शरीराला अनंत यातना देणाऱ्या कर्करोगावरील उपचार पद्धतीला  प्रतिसाद देण्याची धडाडी,कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला भिडण्याची नी पुन्हा आपल्या कलेशी तादात्म्य पावण्याची" विजिगिषु" वृत्ती,लढवय्या बाणा सच्च्या माणसातच अन त्यातही कलेशी इमान नि अतीव प्रेम असलेल्या कलाकारातच असते.
       "इरफान"हा असाच सच्चा कलाकार होता.नैसर्गिक अभिनय,सहज भाव ना कोठे ओढून ताणून आणलेले हास्य ना राग,सार काही सहज नि तितक्याच ताकतीने पडद्यावर उभा राहिलेला.त्याचा"हिंदी मिडीयम"मनाला खूप भावला होता."पानसिंग तोमर"तर तेवढाच खरा नाही अगदी हाच "पानसिंग तोमर"आहे असे वाटू लागण्याइतपत "इरफान खानने"त्याची व्यक्तीरेखा उभी केली होती त्याला तोड नव्हती,"लंच बॉक्स"सारख्या चित्रपटात सुद्धा"साजन फर्नांडिस"चे सेवानिवृत्तीला पोहोचलेल्या व्यक्तीची व्यक्तिरेखा म्हणजे हाच का?एव्हढा सहज अभिनय पूर्ण चित्रपट व्यापून टाकतो.
       अनेक चित्रपटांना मिळालेले पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार... अन अनेक मानमरातब... बॉलीवूड ते हॉलिवूड असा अचंबित करणारा सुंदर प्रवास....यशाच्या अत्युच्य शिखरावर जात असतानाच.... दुर्धर कर्करोगाचा विळख्यातून मी बाहेर पडेन असा विलक्षण आत्मविश्वास बाळगणारा ....हळुवार मनाचा इरफान खान...तेवढ्याच हळुवारपणे जगाचा निरोप घेतो....तेव्हा ती "exit"मनाला चटका लावून जाते....!!

🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

अभिनयातील सहजतेचे उत्तम उदाहरण म्हणजे इरफान खान !
मोहब्बत है इसिलीये जाने दिया, जिद होती तो बाहो मे होती !
पण आज आजाराप्रति ही जिद्द अपयशी ठरली !
एक्स्प्रेशन मधून भावना व्यक्त करणाऱ्या व पाय जमिनीवर असणाऱ्या अभिनेत्याला भावपूर्ण  श्रद्धांजली!

©️शुभांगी विलास पवार,(कंदी पेढा)-नागठाणे, ता.जि.सातारा