श्री संतकृपा इंजिनिअरिंग ऑनलाइन शिक्षण देण्यात अग्रेसर. प्राचार्य : स्वानंद कुलकर्णी


संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालय.


श्री संतकृपा च्या विद्यार्थ्यांना मिळते ऑनलाइन शिक्षण.


कराड दिनांक-


             घोगांव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या या संकटमय काळात श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनानुसार संस्थेच्या फार्मसी व इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांना घरात राहून आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता आला.


        इंजिनिअरिंगच्या शिक्षकांनी लॉकडाऊनच्या या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दैनंदिन अध्ययन व अध्यापनाचे काम ऑनलाईन पध्दतीने सुरु ठेवले होते.


प्राध्यापकांनी work from home अंतर्गत झूम या तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व विषयांची व्याख्याने घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


 या माध्यमातून १००% अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला आहे.


       विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षा गूगल क्लासरूम च्या माध्यमातून घेतल्या. विद्यार्थ्यांना ई-मेल, व्हाट्सअप च्या माध्यमातून गृहपाठ व इतर शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले .तसेच स्वयंम ,NPTEL च्या माध्यमातून व्हिडिओ लेक्चर घेण्यात आली. Course-era, NEAT च्या माध्यमातून नवीन कोर्सेसचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले .अशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचा १००% अभ्यासक्रम पूर्ण केला व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. 


          श्री संतकृपा शिक्षण संस्थेची विविध महाविद्यालये या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी तत्पर सेवा देत आहेत.आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण काळजी घेत आहे. म्हणूनच श्री संतकृपा शिक्षण संस्था आधुनिक ज्ञानाची नवसंजीवनी ठरत आहे. विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय ऑनलाइन शिक्षण देण्यात अग्रेसर आहे अशी माहिती प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.